मित्रांनो तुम्हाला देखील असा प्रसंग आला असेल, की तुम्हाला कोणीतरी काही मेसेज पाठवून आपण मेसेज बघण्या अगोदरच ते डिलीट करतात मग आपण विचार करतो की ह्याने पाठवले तरी काय होते ? का ह्याने मेसेज डिलीट केले असतील ?
तर आज आपण तेच डिलीट केलेले मेसेज कसे पाहू शकतो याबद्दल ट्रिक पाहणार आहोत .
1) जर तुम्ही ANDROID मोबाईल वापरत असाल तर तुम्ही NOTISAVE हा अॅप्लिकेशन प्ले स्टोअर वरुण डाउनलोड करा
2) NOTISAVE डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे अॅक्सेस द्यायचा आहे
3) अॅक्सेस दिल्यानंतर तुम्हाला आलेले WHATSAPP वरील मेसेजेस इथे सुद्धा येतात आणि WHATSAPP वरुण डिलीट झालेले मेसेज तुम्हाला या अॅप्लिकेशनमध्ये दिसतात जसे. खालील चित्रामध्ये दाखविलेले आहे,
या अॅप्लिकेशन मध्ये मेसेजच नाही तर डिलीट केलेले स्टेटस सुद्धा दिसतात .
4) आणि ह्या अप्प मध्ये फक्त WHATSAPP चेच मेसेजेस नाही तर तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही अँन्ड्रॉईड अप्प चे किवा सोशीयल अॅप्लिकेशन म्हणजेच FACEBOOK MESSENGER, HANGOUTS, इत्यादि अॅप्लिकेशन चे सुद्धा डिलीट झालेले मेसेजेस दिसतील. फक्त तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या अॅप्लिकेशन चे अॅक्सेस ह्या NOTISAVE ला देणे गरजेचे आहे .








Post a Comment