आजच्या काळात लहान मुलापासून ते वयोवृद्धा पर्यंत सर्वच जन स्मार्टफोन वापरत आहेत . आणि संगळ्यानाच कधी ना कधी पॅटर्न लॉक ची समस्या आलीच असेल . तर आज आपण कम्प्युटर शिवाय पॅटर्न लॉक कसा काढायचा याबद्दल जाणून घेणार आहोत .
तर चला सुरू करूया !
ही ट्रिक फक्त अँन्ड्रॉईड मोबाईल वरच काम करेल आयफोन ओएस वर काम नाही करणार , पॅटर्न लॉक काढण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईलला Hard Reset मारावा लागतो,
तर अँन्ड्रॉईड मोबाईल Hard Reset कसं मारायच हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत।
मोबाइल Hard Reset मारण्या अगोदर खालील तीन गोष्टी नीट लक्षात घ्या.
- मोबाईल Hard Reset मारल्यानंतर तुमच्या मोबाईल मधील सर्व डेटा हा उडून जाईल .
- Sim Card व Memory Card यामधील काहीही उडणार नाही त्यामुळे याबाबतीत घाबरण्याचे काही कारण नाही.
- जर तुमचं मोबाईल 3.0 version च्या वरचा version असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधला वापरत असलेला Google Account माहीत असणे गरजेचे आहे. नाहीतर frp Lock बसण्याची शक्यता आहे.
- मोबाईल चा पॅटर्न लॉक काढण्यासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार प्रोसेस करा.
- सर्वप्रथम Power Key बटन दाबून मोबाईल Switch Off करा .
2. मोबाईल Recovery Mode मध्ये आणण्यासाठी मोबाईलचा Power On/Off Button + Home Button + Volume Down Button ही तीनही बटन एकसाथ दाबुन ठेवा जोपर्यंत मोबईलचा लोगो येत नाही.
Samsung मोबाइलसाठी = Power On / Off बटन + Volume Up Button चा वापर करावा
Nexus मोबाईलसाठी = Power On/Off Button + Volume Down Button + Volume Up Button चा वापर करावा .
3. मोबाईल चा लोगो आल्यानंतर सर्व बटन सोडून द्या , त्यानंतर तुमचं मोबाईल Recovery Mode मध्ये आलेला दिसेल , खाली वर जाण्यासाठी तुम्हाला आवाज कमी जास्त करण्याच्या बटनांचा वापर करायचा आहे. व सिलेक्ट करण्यासाठी Power Off या बटणाचा वापर करायचा आहे . खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला Wipe Data / Factory Reset हा पर्याय सिलेक्ट करायचं आहे .
4. त्यानंतर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे Yes Delete All User Data ( Yes ) पर्याय सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मोबाईल Hard Reset करून पुन्हा Recovery Mode मध्ये येईल.
5. मोबाइल पुन्हा Recovery Mode मध्ये आल्यानंतर तुम्हाला खालील चित्रात दाखवलेल्या Reboot System Now हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. Reboot केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा पॅटर्न हा निघून गेलेला दिसून येईल . आणि आता तुम्ही पुन्हा मोबाईल वापरू शकता.
तर मित्रांनो आता तुम्हाला कोणत्याही मोबाईल शॉप मध्ये जाऊन पैसे खर्च करायची गरज नाहीये. आता तुम्ही घरबसल्या सुद्धा हे करू शकता.
जय जिजाऊ ! जय शिवराय !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !








Nice
ReplyDeleteHello, mala tuchya blog sobat backlink exchange karaiche ahe
ReplyDeleteContact kara
Post a Comment