ATM कार्ड , DEBIT कार्ड आणि CREDIT कार्ड काय आहे यामध्ये फरक ! Tech Explain ! Marathi Blogger !

ATM कार्ड , DEBIT कार्ड आणि CREDIT कार्ड याबद्दल खूप जनामध्ये गैरसमज होत आहे तर या पोस्टने तुमचे सगळे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी केला आहे. याबद्दल तुम्हाला माहीत असेलही जर  नसेल माहीत तर ही पोस्ट वाचून नक्की तुमचं शंका दूर होतील

      पूर्वी लोक बँकेत पैसे जमा करत असत आणि पैसे काढायचे असले तरीही बँकेत जाव लागत हळू हळू बँकेत लोक खाते खोळू लागले खातेधारकांची संख्या वाढत गेली मग बँकेत गर्दी होयला सुरू झाली तेव्हा यावर उपाय म्हणून एटीएम ही संकल्पना उदयास आली आणि लोक एटीएम चा वापर करू लागले 

 

v  ATM कार्ड :-


ATM कार्ड कोणी वापरले नाही असे कोणी नाही, जवळ जवळ संगळ्या खातेधारकाकडे ATM होते. एटीएमचा वापर फक्त ATM मशीन मधून पैसे काढण्यासाठी होतो. तुम्ही एटीएम इतर कुठे वापरू शकत नाही जसे की नेटबंकिनग, ऑनलाइन शॉपिंग इत्यादि ठिकाणी एटीएमचा वापर होऊ शकत नाही आताही एटीएम हा त्यांच्यासाठी दिला जातो जे 18 वर्षाखालील म्हणजे (MINOR ACCOUNT HOLDERS) ना दिला जातो कारण त्यांनी नको असलेल्या ठिकाणी ATM चा वापर करता येणार नाही आणि ATM हॅक होण्यापासून वाचू शकतील

 

v  DEBIT कार्ड :-


डेबिट कार्ड ची सुविधा ही 18 वर्ष पूर्ण झालेल्या खातेधारकांना म्हणजेच ( MAJOR ACCOUNT HOLDERS ) ना दिला जातो . DEBIT कार्ड मधून तुम्ही एटीएम कार्ड सारखे एटीएम मशीन मधून पैसे काढू शकता शिवाय नेटबंकिंग, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी स्वाइप, करण्यासाठी सुद्धा वापर करू शकता. ATMDEBIT कार्ड यामधील फरक ओळखायच म्हटलं तर तुम्हाला डेबिट कार्ड वर (MasterCard, Visa, RuPay) हे चित्र दिसतील तर एटीएम वर हे चित्र तुम्हाला दिसणार नाही.

(MasterCard, Visa, RuPay) हे एका प्रकारचे Mediaters म्हणजेच मध्यस्थी करणारे आहेत या मेडिअटर्स मुळेच आपण एका बँकेतून दुसऱ्या कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करू शकतो आणि आपल्याला ऑनलाइन शॉपिंग आणि स्वाइप मशीनवर व्यव्हार करण्यासाठी हेच मेडिअटर्स मदत करतात

 

v  CREDIT कार्ड :-


क्रेडिट कार्ड हा संगळ्याकडे असतो असे नाही, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे जवळ जवळ दिसायला सारखेच आहेत क्रेडिट कार्ड वर सुद्धा तुम्हाला (MasterCard, Visa, RuPay) हे चित्र दिसतील. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांचा वापर देखील एक सारखाच आहे  क्रेडिट कार्ड म्हणजे बँक तुम्हाला एक ठराविक रक्कम व्याजावर वापरण्यास देते म्हणजे बँक तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे नसताना खर्च करण्यासाठी उधार पैसे देते व ती दिलेली रक्कम तुम्हाला दिलेल्या वेळेत installment मध्ये पुनः बँकेत भरायची असते

साध्या भाषेत म्हटले तर डेबिट कार्ड मध्ये तुम्हाला अगोदर पैसे बँकेत जमा करावे लागतात नंतरच तुम्ही डेबिट कार्ड द्वारे पैसचा वापर करू शकता, तर क्रेडिट कार्ड मध्ये तुम्ही अगोदर पैसे खर्च करू शकता व नंतर बँकेत पैसे भरू शकता  

 

 

मला आशा आहे की तुम्हाला ATM कार्ड, DEBIT कार्ड आणि CREDIT कार्ड यामधील फरक समजलंच असेल. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता मी तुमच्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि ही पोस्ट तुम्हाला काशी वाटली व तुम्हाला इतर कशासबंधीत माहिती हवी असेल तर मला कमेन्ट बॉक्स मध्ये विचारू शकता ! धन्यवाद  

  

 

 

 


Post a Comment

Previous Post Next Post