फोन बॅटरी लवकर उतरण्याची कारणे व त्यांचे उपाय। Tech Explain ! Marathi Blogger !


तुमची परिस्थितीही अशीच होते जेव्हा तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर उतरते, हो ना मग चला या समस्येला तोंड देऊ या ! 

 
आजच्या दैनंदिन जीवनात मोबाइलचा खूप मोठा वाट आहे। आज आपण मोबाईलची बॅटरी लवकर उतरण्याची करणे जाणून घेणार आहोत व त्यावरील उपाय देखील दिले आहे. जेणेकरून तुमची बॅटरी लाइफ नक्की वाढेल. 
1) 1 .Wifi  :- आज जगाच्या कानाकोपऱ्यात Wifi चा उपयोग होतो. खूप वेळा आपण Wifi ची गरज नसतानाही आपण वायफाय ऑन ठेवतो, तर त्यामुळे होते काय जेव्हापण आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा सतत Wifi नवनवीन नेटवर्क सर्च करत राहतो, नेटवर्क सर्च करण्यासाठी सुद्धा मुबलक बॅटरी उतरते.
उपाय :- जेव्हा Wifi चा वापर होत नसेल तेव्हा Wifi Turn Off करावा.
                    

2. Power Saving Mode :- सर्वच स्मार्टफोन मध्ये Power Saving Mode दिलेला असतो. जर तुम्ही तुमचा फोन Medium Power Saving Mode मध्ये ठेवलात तरीही तुमची बॅटरी मोठ्या प्रमाणात वाचते. Pubg सारख्या हेवी गेम खेळणाऱ्यानी ह्याचा वापर करू नये नाहीतर गेम खेळताना लॅक होण्याची शक्यता आहे.


   3. Notification :- पूर्ण जगामध्ये Whatsapp चा वापर होत आहे. आणि प्रत्येकाच्या Whatsapp मध्ये खूप सारे ग्रुप्स आहेत आणि Whatsapp वर येत असणारे सतत मेसेज आणि सतत वाजत राहणारी मेसेज ट्यून बॅटरी ड्रेनेज होण्यास कारणीभूत ठरते, त्याचबरोबर मोबाइल मध्ये असणारे इतर Apps व त्यांचे Notifications बॅटरी लवकर उतरण्याचे मुख्य कारण आहे.
उपाय :- Whatsapp मध्ये तुम्ही फक्त ग्रुप्स नोटिफिकेशन Mute करून ठेवू शकता व मोबाईल मधील Apps चे Notifications खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन नको असलेल्या App चे Notification बंद करू शकता व बॅटरी Drain होण्यापासून वाचवू शकता.   


4. Brightness :- Braightness हा देखील बॅटरी उतरण्याचे कारण आहेच व ते डोळ्याना सुद्धा हानिकारक ठरू शकते. खूप जन आपल्या मोबाईल ची Brightness जास्त ठेवतात त्यामुळे बॅटरी लवकर उतरते व डोळे खराब होण्यास कारणीभूत ठरते. जर तुम्हीही तेच करत असाल तर आताच सावध रहा.
उपाय :- यावर उपाय म्हणून तुम्ही Brightness AutoMode वर ठेवून बॅटरी वाचवू शकता व डोळेही.
  
5. Screen Timeout :- जर तुमच्या मोबाईल मध्ये Screen Timeout जर एक मिनिटाच्या जास्त असेल तर तुम्ही मोबाइल वापरत नसतानाही मोबाईलचा डिस्प्ले हा एक मिनिट अॅक्टिव राहतो त्यामुळे बॅटरी लवकर उतरु शकते, यावर उपाय म्हणून तुम्ही Screen Timeout हा 30 सेकंड वर सेट करून बॅटरी वाचवू शकता.


6. अनावश्यक Apps :- आपल्या मोबाईल मध्ये असे खूप अॅप्लिकेशन असतात ज्यांचा आपण कधीही वापर करत नसतो पण ते Applications बॅकग्राऊंड मध्ये रन होत असतात त्यामुळे हे बॅटरी उतरण्यामागे व स्टोरेज डेटा फूल होण्यामागे मुख्य कारण आहे.
उपाय :- नको असलेले अॅप्लिकेशन हे तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन Uninstall किंवा Disable करून बॅटरीची कार्यक्षमता वाढवू शकता.

7. GPS (Location) आणि NFC :- जीपीएस आणि NFC हेसुद्धा फोनची बॅटरी drain करण्यास कारणीभूत ठरतात. जर तुम्ही या सेटिंग चा वापर करत नसाल तर ते बंद करून तुम्ही बॅटरी वाचवू शकता. 
  
8. Vibration Mode :- आपल्या मोबाईल मध्ये एक वायब्रेट मोटर असते आपल्याला कॉल आल्यावर किंवा मेसेज आल्यावर ती मोटर वायब्रेट होते खूप जणांच्या कीबोर्ड वरील बटन दाबल्यावरही वायब्रेशन होते किंवा स्क्रीन टच केल्यावर ही वायब्रेट होते, आता तुम्हीच विचार करा की वायब्रेट मोटर वारंवार चालू होत राहिली तर बॅटरी टिकेल का त्यामुळे तुम्हाला आवश्यक नसलेल्या ठिकाणी वायब्रेशन मोड बंद करून बॅटरी वाचवू शकता.




9. Syncohrization :- जर तुमच्या मोबाईलमध्ये synchorization ऑन असेल तर आताच तो बंद करा कारण synchorization ऑन असल्यावर आपला डेटा हा बॅकग्राऊंड ला रन होत असतो तो वारंवार Backup घेत असतो त्यामुळे तुमच्या बॅटरी सोबतच तुमचं मोबाईल डेटा ही संपवतो

10. Auto Screen Rotation :- आपल्या मोबाईल मध्ये खूप प्रकारचे sensors फिट केलेले असतात, स्क्रीन रोटेशन साठी Accelometer आणि Gyroscope या सेंसरचा वापर केला गेला आहे, आपला मोबाइल थोडा डिग्री जरा हलला तर लगेचच स्क्रीन rotate होते 24 तास हे sensors कार्यरत ठेवण्याचे काम बॅटरी करते त्यामुळे सहाजिकच हादेखील बॅटरी उतरण्याचा मुख्य कारण आहे, त्यामुळे तुम्ही स्क्रीन रोटेशन हा ऑप्शन अॅडजस्ट करून बॅटरी वाचवू शकता


11. Auto Update Apps :- आपल्या मोबाईल मधील Apps हे ऑटोमॅटिक अपडेट होत असतील तर तुमचा मोबाईल लवकर हीट होतो व तुमचा मोबाईल डेटा ही संपतो आणि यामुळे ही बॅटरी लवकर उतरते त्यामुळे प्ले स्टोर मध्ये जाऊन auto अपडेट App हा पर्याय बंद करा आणि बॅटरीची कार्यक्षमता वाढवा 


 

  
12. Live किंवा 3D Wallpapers :- खूप जन मोबाईल Attractive वाटण्यासाठी मोबाईल डिस्प्ले वर Live किंवा 3D Wallpapers ठेवतात पण तेच Wallpapers वारंवार हालत (Move)असतात, आणि त्याचा परिणाम हा बॅटरी वर होतो त्यामुळे एकदम साधा सिम्पल वॉलपेपर ठेवलेले एकदम उत्तम
13. प्रत्यक्ष सूर्यकिरण :- प्रत्येकजण हा कामानिमित्त बाहेर जात असतो, आणि बाहेर उनामध्ये मोबाईल वापरत असतो, त्यावेळेस मोबाईल हा खूप गरम होतो व त्याचा परिणाम हा बॅटरी वर होतो म्हणून उन्हात जेवढा मोबाईल वापरणे टाळता येईल तेवढे चांगले आहे.     

मित्रांनो तुम्हाला पोस्ट काशी वाटली हे खाली कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की संग आणि तुम्हाला यापुढे कोणत्या ट्रिक बद्दल पोस्ट हवी आहे ते नक्की सांगा 
                                                                                                                                            जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Post a Comment

Previous Post Next Post