आपल्या मोबाइल मध्ये असणाऱ्या सेन्सर बद्दल तुम्हाला माहीत आहे का या गोष्टी ! Tech Explain ! Marathi Blogger !

         आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या मोबाईल मध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते कशा  पद्धतीने कामे करतात . ह्या सेन्सर मुळेच आपला मोबाईल स्मार्ट बनतो आणि म्हणून आताच्या जगात आपण मोबाइल न म्हणता स्मार्टफोन असे म्हणतो 





1) Accelerometer:-

       

 हा सेन्सर सगळ्याच मोबाईल मध्ये असतो आणि तुम्ही सुद्धा ह्या सेन्सर बद्दल ऐकलं असाल एक्सेलोमिटर हा एक प्रकारचा Oreintetion सेन्सर आहे म्हणजे तो मोबाईलमध्ये रोटेशन करण्याचे काम करतो ! जेव्हा आपण मोबाईल आडवा किंवा उभा करतो त्याचप्रमाणे आपल्या मोबाइलची स्क्रीन सुद्धा आडवी किंवा उभी होते म्हणजेच (Landscape & Potrait Mode) होते हेच मोबाइलला आउटपुट देण्याचे काम हा सेन्सर करतो.  

2) Gyroscope:- 



गायरोस्कोप हा देखील एक्सेलोमिटर या सेन्सर सारखाच काम करतो पण गायरोस्कोप  हा एक्सेलोमिटर पेक्षा अडवांस आहे,  ह्या सेन्सरचा वापर जेव्हा तुम्ही  रेसिंग गेम्स खेळता त्यावेळी आपल्याला कार कंट्रोल करण्यासाठी म्हणजे कार डावीकडे वळायला मोबाईल डावीकडे झुकवावा लागतो कार उजव्या बाजूला वळायला मोबाईल उजवीकडे झुकवावा लागतो,  तेव्हा ती कार जशी आपल्याला हवी त्याचप्रमाणे वळते हे मोबाईलला कसे कळते तर हयाबद्दल अचूक माहिती मोबाईलेला देण्याचे काम गायरोस्कोप सेन्सर करतो. 

3) Magnetometer:-



  हा सेन्सर आपल्या मोबाईलमध्ये Compass म्हणजेच दिशा दर्शकाचा काम करतो . सगळ्याच स्मार्टफोन मध्ये Compass हा अॅप्लिकेशन आहे जो आपल्याला पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण या दिशा दाखवतो. याच सेन्सरचा उपयोग आपण एखाद्या Metal Detecter अॅप्लिकेशन द्वारा मेटल डिटेक्ट करू शकतो की ज्याने आपल्याला हे समजेल की मोबाईलच्या आजू बाजूला चुंबकीय वस्तु किंवा धातू आहे किंवा नाही 

4) Proximity Sensor:- 




Proximity सेन्सर हा तुम्हाला आपल्या सेल्फी कॅमेऱ्याच्या आजूबाजूला असलेला दिसून येईल तर हा सेन्सर आपल्या मोबाईलशी असणारी जवळीकता मोजतो त्याच्यामुळे काय होते तर जेव्हा तुम्हाला कॉल येतो तेव्हा हा सेन्सॉर अॅक्टिव होतो आणि तुम्ही तो कॉल उचलल्यानंतर  मोबाईल कानाजवळ घेऊन जाता त्याच क्षणी तुमच्या मोबाईलची स्क्रीन बंद होते आणि जसा मोबाईल तुम्ही कानापासून दूर करता तशी ती स्क्रीन ऑन होते. त्यामुळे कॉल उचलल्यानंतर चेहऱ्याने टच होऊन कॉल कट होऊ नये  किंवा म्युट होवू नये व असाच इतर समस्यापासून आपण वाचतो आणि यामुळे मोबाइलची बॅटरी सुद्धा वाचते 


5)  Light Sensor:- 



हा सेन्सर सुद्धा Proximity सेन्सर च्या बाजूलाच स्थित असतो तर हा सेन्सर मोबाइल स्क्रीनची ब्राइटनेस अॅडजस्ट करतो, जेव्हा आपण मोबाईल वापरत असतो तेव्हा हा सेन्सर आपल्या आजूबाजूला कीती प्रकाश आहे किंवा कसं तापमान आहे हे लक्षात घेऊन मोबाइलला आउटपुट देतो  व त्यानुसार मोबाइल स्क्रीनची ब्राइटनेस कमी जास्त किंवा आपल्या योग्य तेवढी ब्राइटनेस पुरवितो. म्हणजेच जर तुम्ही खूप उन्हात बाहेर असाल तर ब्राइटनेस खूप वाढते व जेव्हा रात्र होते तेव्हा ब्राइटनेस अजून कमी होते 

6) Barometer:- 



हा सेन्सर एटमॉस्फीयर चा दबाव  मोजतो हा सेन्सर आपल्याला समुद्र सपाटीपासून आपण कीती उंचिवर आहोत हे सांगतो हा सेन्सर आपल्याला दोन प्रकारे फायदेशीर पडतो एक म्हणजे हा आपली लोकेशन जीपीएस सेन्सरच्या मदतीने अचूक सांगतो आणि दूसरा म्हणजे हवामानात होणारे बदल देखील ह्या सेन्सर मुले समजते. आणि एखाद्या हेल्थ अॅप्लिकेशन द्वारा आपण कीती चढाई केली हेसुद्धा दाखवतो 


7) Thermometer:- 



हा सेन्सर सगळ्याच मोबाइल मध्ये असतो,  हा सेन्सर आपल्या मोबाईल मधील CPU आणि बॅटरीचे तापमान मोजतो आणि आपला मोबाईल गरम होत असेल तर त्याला नियंत्रणात आणायचा काम करतो 

8) Pedometer:- 



हा एक अडवांस सेन्सर आहे हा सेन्सॉर सगळ्याच मोबाईल मध्ये असतो असे नाही आणि हा सेन्सर आपल्याला आपण दिवसभरात कीती पाऊल चाललो हे अचूक सांगतो  

9) Global Positioning System (GPS):-  



 ह्या सेन्सर बद्दल कुणाला माहीत नाही असा कोणीही नाही . हा सेन्सर मोबाइल ची लोकेशन ट्रेस करण्यासाठी वापरला जातो 

10) Fingerprint Sensor, Iris Scanner:- 



आता ह्या सेन्सर बद्दल कोणाला माहीत नाही असे कोणीच नाही , हा सेन्सर आपल्याला मोबाइलची सेक्युर्टी इम्प्रूव करन्यासाठी दिला जातो म्हणजेच आपण मोबाईल मध्ये सुरक्षा म्हणून fingerprint स्कॅनरचा उपयोग करू शकतो, इरिस स्कॅनर म्हणजे आपण आपल्या डोळ्यांच्या पुतळी देखील स्कॅन करून सेक्युर्टी वाढवतो 


11) Radiation Sensor :- 
हा सेन्सर जापनीस लोकांच्या मोबाईले मध्ये वापरला गेला आहे .भविष्यात हा सेन्सर आपल्या  मोबाईल मध्ये येण्याची शक्यता आहे , या सेन्सर मुले आपल्याला मोबाइल मधील Sar Value व आपल्याला आजूबाजूच्या परिसरात कीती हानिकारक Radiation आहे  ते सांगतो . 


12) Humidity Air Sensor:- 



हा सेन्सर सुद्धा अजूनही कोणत्याच मोबाईल मध्ये नाहीये. ह्या सेन्सरचा काम आहे आपल्या सभोवताली असणारया हवामानाची आर्द्रता सांगणे आपण ज्याठिकाणी असतो त्या ठिकानावारील  हवमाणतील आर्द्रता आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे सांगतो 

Post a Comment

Previous Post Next Post