इथे मी विंडोज 7 ची इंस्टॉल करण्याची पद्धत दाखवली असली तरी इतर ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉल करणे अगदी सेम आहे . कम्प्युटर फॉरमॅट मारणे किंवा ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ( विंडोज XP, 7 ,8, 10,) इंस्टॉल करणे अगदी सोपे आहे ! तर चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या पद्धतीने .
टिप :-
1) पीसी स्टार्ट केल्यावर तुम्हाला स्क्रीन वर काही पर्याय येतात जसे की खालील चित्रात दाखवले आहे . आपण जो पेनड्राइव कनेक्ट केला आहे तो सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला BOOT MENU मध्ये जायचं आहे
BOOT MENU मध्ये जाण्यासाठी F12 हा बटन प्रेस करायचा आहे
टिप :-
- ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉल करण्यासाठी आपल्याकडे BOOT केलेला पेन ड्राइव असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला पेन ड्राइव BOOT कसं करायच हे माहीत नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरुन पेनड्राइव बूट कसे करायचे ते जाणून घ्या !
1) पीसी स्टार्ट केल्यावर तुम्हाला स्क्रीन वर काही पर्याय येतात जसे की खालील चित्रात दाखवले आहे . आपण जो पेनड्राइव कनेक्ट केला आहे तो सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला BOOT MENU मध्ये जायचं आहे
BOOT MENU मध्ये जाण्यासाठी F12 हा बटन प्रेस करायचा आहे
2) F12 हा बटन दाबल्यानंतर तुम्हाला खाली चित्रात दाखवलेली विंडो ओपेन होईल , खाली विंडो ओपेन झाल्यानंतर तुम्हाला आपला पेनड्राइव सिलेक्ट करायचा आहे आणि ENTER दाबायचा आहे .
3) पेनड्राइव सिलेक्ट करून ENTER दाबल्यांनातर लगेच खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे पेनड्राइव मधून विंडोज लोड व्हायला सुरुवात करेल
4) आणि त्यानंतर तुम्हाला खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे भाषा निवडायची आहे व NEXT या बटणावर क्लिक करायचा आहे.
5) भाषा निवडून झाल्यानंतर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे INSTALL NOW यावर क्लिक करा .
6) INSTALL NOW वर क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात MICROSOFT SOFTWARE LICENSE TERMS ही विंडो ओपेन होईल आणि खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे i accept the license terms या चेकबॉक्स वर टिक करून NEXT बटणावर क्लिक करा
7) त्यानंतर तुम्हाला खालील चित्रात दाखवल्याप्रमणे INSTALLATION TYPE विचारले जाईल तेव्हा CUSTOM (ADVANCED) TYPE वर क्लिक करा
8) CUSTOM वर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे DISK PARTITION ची विंडो ओपेन झालेली दिसेल, त्यात तुम्हाला तुम्ही बनवलेल्या ज्या PARTITION मध्ये विंडोज इंस्टॉल करायचा आहे ते PARTITION सिलेक्ट करा आणि NEXT वर क्लिक करा
9) हे करताच WINDOWS फाइल्स कॉपी करायला सुरुवात करेल आणि ही प्रोसेस पूर्ण होयला कमीत कमी 15 मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा तास घेईल जसे खालील चित्रात दाखवले आहे !
10) प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला समोर windows will restart in 10 second असा मेसेज येईल तेव्हा तुम्हाला पेनड्राइव काढायचा आहे नाहीतर पुन्हा स्टारटिंग पासून प्रोसेस चालू होईल तर ही गोष्ट नक्की
ध्यानात ठेवा .
11) पीसी रिस्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरायची आहेत जसे खालील चित्रात दाखविले आहे ! तुम्हाला हव असलेले नाव तुम्ही टाकून नेक्स्ट वर क्लिक करा
12 ) नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड ठेवण्यासाठी विचारले जाईल जर तुम्हाला पासवर्ड ठेवायचा असेल तर ठेवू शकता नाहीतर नेक्स्ट या बटणावर क्लिक करून पुढच्या प्रोसेस काढे जाऊ शकता !
13) तर पुढच्या प्रोसेस मध्ये तुम्हाला खालील विंडो मध्ये दाखवल्याप्रमाणे PRODUCT KEY विचारली जाईल जर तुमच्या कडे प्रॉडक्ट की असेल तर ती टाकू शकता नसेल तर नेक्स्ट बटणवर क्लिक करून पुढे जाऊ शकता
13)त्यानंतर खालील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे use recommended setting यावर क्लिक करून पुढे जायच आहे
14) त्यानंतर खालील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे DATE आणि TIME सेट करा .
15) त्यानंतर तुमच्यासाठी असणारा योग्य तो NETWORK सेट करा . खाली दाखवल्याप्रमाणे
16) आणि आता तुमच्या पीसी मध्ये पूर्णरीत्या Windows 7 इंस्टॉल झालं आहे आता तुम्ही तुमचा पीसी वापरू शकता !
पोस्ट आवडली असेल तर लाइक शेअर फॉलो करायला विसरू नका आणि विंडोज इंस्टॉल करताना तुम्हाला काही समस्या आल्या तर तुम्ही मला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये विचारू शकता तुम्हाला मी पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !


















Post a Comment