# " WhatsApp " हा आपल्या जीवनाचा एक भाग झालेला आहे ! WhatsApp चा वापर कोण करीत नाही हे सांगायला नको ! आज आपण मोबाईल नंबर सेव न करता WhatsApp मेसेज कसा करायचा ! ते पाहणार आहोत !
# कधीतरी तुम्हाला देखील काही व्यक्तीना काही कामानिमित्त किंवा इतर कारणावरून एकदाच मेसेज करायचा असतो ! तर त्यासाठी आपल्याला अगोदर त्या व्यक्तीचा नंबर सेव करायला लागतो आणि मगच मेसेज करता येतो, पण आता नंबर सेव करायची गरज नाहीये पहा ही ट्रिक !
अ) सर्वप्रथम तुम्ही वापरत असलेला ब्राऊजर ओपेन करा (Chrome , Safari , Uc Browser ,etc.) जर तुम्ही अँन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर क्रोम ओपेन करा आणि आयफोन वापरत असाल तर सफारी किंवा क्रोम दोन्ही वापरू शकता !
ब) आणि सर्च बार मध्ये (https://wa.me/91मोबाईल नंबर) कंसात दाखविल्याप्रमाणे ब्राऊजर मध्ये लिंक ओपेन करा 91 च्या पुढे मेसेज करायचं आहे, त्या व्यक्तीचा मोबईल नंबर टाका आणि खाली आलेल्या लिंक वर क्लिक करा
क) त्या लिंक वर क्लिक केल्यालगतच तुम्हाला खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे " Messege " हा बटन दिसेल त्यावर प्रेस करा ! व मेसेज बटन वर क्लिक करताच तुम्ही व्हाटसप्प मध्ये एंटर व्हाल आणि त्या व्यक्तीस तुम्ही मेसेज करू शकता ! जसे की खालील दुसऱ्या चित्रात दाखवले आहे !
मला आशा आहे की ही ट्रिक नक्कीच तुम्हाला आवडली असेल ! कशाप्रकारे आपण नंबर सेव न करता कोणालाही मेसेज करू शकतो, तर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, व तुम्हाला कशासबंधीत जर ट्रिक्स आणि टिप्स विचारायच्या असतील तर तेही विचारू शकता !
जय हिंद ! जय महराष्ट्र !





Post a Comment