मी आज तुम्हाला काही अशा Android Applications बद्दल सांगणार आहे ! जी
आपल्याला दैनंदिन जीवनात खूप उपयोगी आहेत ! जर
तुम्ही ते Apps वापरत नसाल तर आताच इंस्टॉल करा ! तर कोणते आहेत ते Apps आणि काय आहे त्यांचा उपयोग
त्याबद्दल जाणून घेणार आहोत !
1) Car Info :-
Play Store वर असे खूप सारे Apps तुम्हाला मिळतील. हा App वापरण्यास खूप सोपा आहे आणि यामध्ये तुम्हाला खूप Features आहेत. ते खालीलप्रमाणे
1)
या App मध्ये तुम्ही गाडीच्या नंबरप्लेट वरुन
गडीमालकाची माहिती काढू शकता !
2)
जर तुम्ही कधी ट्रॅफिक नियम तोडले असाल तर तुम्हाला बसलेले
फाइन सुद्धा तुम्ही या App मध्ये पाहू शकता
3)
तुम्हाला प्रतेक राज्यात पेट्रोल / डिझेल दर किती आहे ते
समजते !
4)
तुमच्या ड्रायविंग लायसेंस वरुन किंवा आरसी बुक नंबरवरुन
त्याची व्हॅलिडिटी व स्टेटसची माहिती काढू शकता !
2) Google pay :-
ऑनलाइन आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी Play Store वर खूप Apps आहेत जसे की (PayTm , PhonePe , BhimApp, etc) पण Google
Pay हा Google कंपनीचाच असून हा विश्वास
करण्यायोग्य आणि वापरण्यास खूप सोपा आहे, गूगल पे वर तुम्ही
1)
एक लाखापर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता कोणतेही चार्जेस
लागत नाहीत !
2)
लाइट बिल , मोबाइल रीचार्ज , ब्रॉडब्रॅंड इंटरनेट रीचार्ज ,
केबल रीचार्ज , गॅस बूकिंग ,लॅंडलाइन रीचार्ज , पानी बिल, भरू शकता !
3)
त्याचे प्रमाणे इन्शुरेंस आणि लोन ईएमआय पेमेंट भरू शकता
सर्व फायनॅन्स कंपनीला !
3) Digi Locker :-
Digilocker हा सरकारी App आहे !
कधी तुम्ही बाहेर गाडी घेऊन गेलात आणि तुम्ही तुमचं लायसेंस कागदपत्र घेऊन जायला
विसरलात आणि त्याचवेळी जर तुम्हाला पोलिस कर्मचाऱ्यानी पकडले तर आपल्याला फाइन
भरल्याशीवाय काही पर्याय नाही ! डिजिलोकेर ह्या App मध्ये तुम्ही तुमचे सर्व कागदपत्रे
हे सरकारी वेबसाइट वरुन डाउनलोड करून ठेवू शकता यामध्ये तुम्ही आधार कार्ड लिंक
केल्यावर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड , 10th रिजल्ट
, 12th रिजल्ट ,वोटिंग कार्ड , ड्रायविंग लायसेंस
, आधार कार्ड व अन्य कागदपत्रे इथे लिंक करून ठेवू शकता व तुम्हाला योग्य त्यावेळी
वापरता देखील येतात !
4) M-indicator :-
ट्रेन
ने प्रवास कोण करत नाही हे सांगायला नको ! ट्रेनने आपल्या ज्याठिकाणी जायचं आहे त्याठिकाणी जाणारी ट्रेन आपण असलेल्या स्टेशन वर कधी व कोणत्या प्लॅटफॉर्म वर येईल हे
आपल्याला माहीत नसते, पण या App मध्ये तुम्हाला ट्रेन कधी , केव्हा , कुठे
व कोणत्या प्लॅटफॉर्म वर येईल याची सर्व माहिती मिळते, जर तुम्ही रोज ट्रेनने
प्रवास करत असाल तर हा App तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, आणि
हा App इतर App पेक्षा वापरण्यास खूप
सोपा देखील आहे !
5) Policy Bazaar :-
गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या
घरी गाड्या आहेत ! गाड्या आहेत मग त्यांचा इन्शुरेंस देखील आला , तर आता इन्शुरेंस
देखील ऑनलाइन भरण्यासाठी कंपलसरी केले आहे, इन्शुरेंस कंपनी देखील खूप आहेत आणि
प्रतेक कंपनीच्या सेवा आणि चार्जेस वेगवेगळे आहेत तर या पॉलिसी बाजार App वरती
तुम्हाला प्रतेक कंपनीची सेवा व चार्जेस यांची तुलना करून तुम्हाला कोणत्या
कंपनीचा इन्शुरेंस आपल्यासाठी योग्य आहे ते दाखवतो. व या App
वरती आपण आपला इन्शुरेंस घरी बसूनही भरू शकता किंवा रीन्यू देखील करू शकता !
या App मध्ये तुम्ही (Term Life
insurance, Health Insurance, Car insurance, Travel insurance, Two Wheeler
Insurance, etc.) हे सर्व इन्शुरेंस तुम्ही या App मध्ये भरू शकता !
6) Alarmy :-
मित्रांनो
तुम्हीपण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावता पन सकाळी अलार्म वाजल्यावर तो बंद
करून परत झोपता ! मग हा अलार्म तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे, या अलार्म मध्ये
काही टास्क आहेत ते असे आहेत जोपर्यंत तुम्ही सेट केलेला टास्क पूर्ण करत नाहीत
तोपर्यंत अलार्म बंद होत नाही आणि तो टास्क पूर्ण होईपर्यंत तुमची झोप उडलेली असते
व तुम्ही उठण्यासाठी सज्ज होता, हा App नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरेल !
(Take a Picture, Maths
Mission, Barcode QR sacn, Shake, etc) अशाप्रकारचे टास्क ह्या
अलार्म मध्ये आहेत आणि मी Maths Mission हा टास्क वापरतो !
7) Google
Translate :-
गूगल ट्रान्सलट हा देखील गूगल कंपनीचाच App आहे ,
या App मध्ये जगात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषांचे भाषांतर तुम्ही
करू शकता. तुम्ही या App मध्ये जाऊन Tap To Translate
हा पर्याय Enable केल्यावर तुम्ही कॉपी केलेले
वाक्य, शब्द किंवा उतारा हव्या त्या भाषेत ऑटोमॅटिक ट्रान्सलट करून देतो तुम्ही जर
ऑनलाइन पुस्तके वगैरे वाचत असाल किंवा कोणाशी Whatsapp चॅट करत
असाल मोबाईल मध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा App उपयुक्त ठरतो,
त्याचबरोबर तुम्ही आवाज रेकॉर्ड करूनही translation करू शकता !
8) CamScanner :-
तुम्ही जर ऑनलाइन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला स्कॅनर मशीन ची
आवंशक्यता असते फोटो व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करण्यासाठी पण आता स्कॅनर मशीन ची
काही गरज नाहीये तुम्ही या App द्वारे आपला फोन कॅमेरा वापरून सर्व प्रकारचे कागदपत्र स्कॅन करून चांगल्या क्वालिटी मध्ये सेव करू शकता ! नोट्स, पावत्या, बिझनेस कार्ड, प्रमाणपत्रे इ.
स्कॅन केलेले कागदपत्र स्पष्ट आणि व्यवस्थित दिसतात
त्याचप्रमाणे स्कॅन केलेले कागदपत्र तुम्ही पीडीएफ फाइल मध्ये कन्वर्ट करू शकता आणि
शेअर सुद्धा करू शकता
मित्रांनो या पोस्टमधील सर्वच App आपल्याला दैनंदिन जीवनात खूप उपयोगी आहेत ! हे सर्व Apps एकदम सुरक्षित आहेत म्हणून कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही हे Apps वापरू शकता !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !






































Post a Comment