Iphone Disable झालाय मग वापरा ही ट्रिक ! Tech Explain ! Marathi Blogger !


ही पोस्ट आयफोन Users साठी आहे ! मित्रांनो तुम्ही जर आयफोन वापरत असाल तर तुम्हालाही आयफोन Disable ही समस्या कधी ना कधी आलीच असेल ! आणि त्यावेळी तुम्ही काय करता ? साहजिकच तुम्ही मोबाईलबद्दल माहीत असलेल्या व्यक्तीकडे जाता किंवा मोबाईल शॉपमध्ये जाता आणि ते तुमच्याकडून समस्या सोडवण्यासाठी काही Charges घेतात !

आता तुम्हीपण घरबसल्या ही समस्या सोडवू शकता तर खाली दिलेल्या स्टेप्स व्यवस्थित समजून फॉलो करा ! आणि मिनिटातच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल !
आवश्यक गोष्टी :-
           1)  यासाठी तुमच्याकडे Computer किंवा Laptop असला पाहिजे .
           2)  शक्यतो सॉफ्टवेअर मारताना Orignal Usb चाच वापर करा.
           3)  आणि इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे .
           4) तुमच्या मोबाईलची बॅटरी ही 60 टक्केच्या वर असली पाहिजे.  
           5) तुम्ही मोबाईल मध्ये वापरत असलेला Apple id तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे 

    1)  सर्वात प्रथम आपलयाला मोबाईलचा Firmware डाउनलोड करायला लागेल, त्यासाठी (ipsw.meया वेबसाइट वर जायचं आहे व खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे Identify My Device यावर क्लिक करा !


2)  क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील चित्रात दाखवलेला वेबपेज ओपेन होईल व त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्चबार मध्ये तुमच्या मोबाईलच्या मागे लिहिलेला Model Number टाकायचा आहे आणि identify my device यावर क्लिक करायचं आहे.    


हे सर्व केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिवाइस चा लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करायचा आहे, त्यासाठी खालील तारखेनुसार तुम्ही Firmware डाउनलोड करू शकता !



Firmware डाउनलोड होण्यासाठी लागणारा वेळ हा तुमच्या इंटरनेट स्पीड वर अवलंबून आहे !




      आता तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप मध्ये itunes इंस्टॉल केलेला असेल तो ओपेन करा. नसेल तर (https://www.apple.com/in/itunes/ या लिंक वर क्लिक करून तुम्ही itunes डाउनलोड करू शकता व इंस्टॉल करू शकता, इंस्टॉल केल्यानंतर itunes ओपेन करा आणि तुमचा मोबाईल पीसी किंवा लॅपटॉपला Usb द्वारा कनेक्ट करायचा आहे. 


इथे एक गोष्ट लक्षात घ्या सॉफ्टवेअर मारतावेळी तुमच्या मोबाईलची बॅटरी 60% च्या वर चार्ज असली पाहिजे, जसे की वर मी आवश्यक गोष्टी यात लिहिले आहे. मोबाईल कनेक्ट करण्यासाठी मोबाईल Switch Off करा आणि मोबाईलचा मधला बटन दाबून ठेवून Usb कनेक्ट करा ! 

त्यांनंतर मोबाईलवर Apple चा लोगो आल्यावर बटन सोडून द्या व लगेचच तुम्हाला तुमचा मोबाईल हा खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे itunes Mode मध्ये आलेला दिसेल.  


आणि पीसीवर डिवाइस कनेक्ट झाल्यानंतर आयट्यून्स मध्ये तुम्हाला खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल तर इथे आपल्याला Restore आणि Update हे दोन पर्याय दिसत आहेत. जर तुम्ही Update पर्याय निवडलात तर तुमचा सर्व मोबाईलमधील डेटा सुरक्षित राहतो आणि Restore मारलात तर तुमचा सर्व डेटा उडून जातो तर ही गोष्ट लक्षात ठेवा.



आपण Firmware अगोदरच डाउनलोड केला असल्यामुळे तो Firmware सिलेक्ट करण्यासाठी (अपडेट साठी Update पर्यायावर SHIFT+RIGHT CLICK दाबा), आणि (Restore साठी Restore पर्यायावर SHIFT+ RIGHT CLICK दाबा) त्यानंतर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमचा Firmware ज्याठिकाणी डाउनलोड झाल आहे तेथे जाऊन तो सिलेक्ट करा आणि ओपेन वर क्लिक करा



हे सगळ करून झाल्यावर तुमचा मोबाईल खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे अपडेट होण्यास सुरुवात होईल, व दहा ते पंधरा मिनिटात तुमचा अपडेट प्रोसेस कंप्लीट होईल व त्यानंतर त्यामध्ये तुम्ही वापरत असलेला Apple id टाका आणि तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकता


याप्रमाणे तुम्ही या Disable समसयेतून बाहेर येऊ शकता ! यानंतर तुम्हाला कशासंबंधित पोस्ट हवी आहे ते कमेन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता , धन्यवाद !
                                                    जय हिंद ! जय महाराष्ट्र !


Post a Comment

Previous Post Next Post